Monday, May 23, 2022

जेईई मुख्य परीक्षेबाबत मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :जेईई मुख्य परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. आयआयटीसह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय

स्तरावर ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. आता परीक्षेचं पहिलं सत्र जून तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.

त्याची दखल घेऊन राष्ट्रीय चाचणी कक्षाने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 21 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती.

गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेवरून वाद सुरू होता. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा एप्रिल महिन्यानंतर घ्यावी, अशी मागणी केली होती. तसेच या परीक्षेसाठी दोन ऐवजी चार वेळा संधी देण्यात

यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नॅशन टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. जेईई मुख्य परीक्षा 2022 ची तारीख आता नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेचे पहिले सत्र २१ एप्रिल ते ४ मे या

कालावधीत होणार होते. सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा आता २० ते २९ जून दरम्यान होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ ते २९ मे या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही परीक्षा

आता २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या

प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे (नीट) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून यंदा देशातील ५४३ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!