Thursday, October 5, 2023

वडाळा येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व वडाळा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय ते सांगवी रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेपर्यंत आज वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

सांगवी रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष बी.एस मंडलिक यांनी उपक्रमाची माहिती देताना गावापासून बहिरोबा मंदीर पर्यंत दुतर्फा वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणार असल्याचे सांगितले. वडाळ्याचे सरपंच ललित मोटे व सोनई येथील पसायदान-आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेच्या जिल्हा सचिव सूमन तिजोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी उपसरपंच सचिन मोटे,माजी सरपंच बाबासाहेब मोटे,निखील मोटे,पिनू मोटे,बाळासाहेब जामकर,सुनील राऊत,अजय आढाव,मनोहर लवांडे,अर्जुन कु-हाडे व ज्यांच्या घरासमोर उपक्रम राबविण्यात आला ते ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण बाबत प्रबोधन करुन उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. बी एस मंडलिक यांनी आभार मानले.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!