माय महाराष्ट्र न्यूज:राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बुधवारी 3837 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 1350 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला तर सोयाबीनला 7333 रुपये इतका भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत काल कांदा नंबर 1 ला 950 रुपये ते 1350 रुपये, कांदा नंबर 2 ला 500 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला 250 ते 450 रुपये, गोल्टी कांदा 600 ते 800 रुपये भाव मिळाला.
जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.सोयाबीनला कमीत कमी 6850 रुपये तर जास्तीत जास्त 7333 रुपये व सरासरी 7250 रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
राहाता बाजार समितीच्या कोल्हार बु. येथील उपआवारात सोयाबीनला सरासरी 7216 रुपये, गव्हाला 1800 रुपये तर हरबरा 4500 रुपये
प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.