माय महाराष्ट्र न्यूज:गुरुवारी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा झटका बसला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज सीएनजीच्या
दरात किलोमागे अडीच रुपयांनी वाढ झाली आहे. एका आठवड्यात आतापर्यंत सीएनजीवर 9.10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.मात्र, गुरुवारी पेट्रोल-डिझेलवर नागरिकांना
दिलासा मिळाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. गेल्या 17 दिवसांत पेट्रोल 10 रुपयांनी महाग झाल्याची माहिती आहे. अनेक दिवसांपासून प्रतिलिटर 80 पैशांची वाढ होत आहे.
आदल्या दिवशीही सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज 2.5 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 69.11 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 71.67 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.यूपीच्या मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी 76.34 रुपयांना विकला जात आहे. गुरुग्राममध्ये
सीएनजीची किंमत आज 77.44 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचवेळी रेवाडीमध्ये आज सीएनजी 79.57 रुपयांना मिळत आहे.त्याचवेळी आजपासून कर्नाल आणि कैथलमध्ये सीएनजी 77.77 रुपये प्रति किलो
दराने विकला जात आहे. कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरबद्दल बोलायचे झाले तर सीएनजीचे दर 3 रुपयांनी वाढल्यानंतर 80.90 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. राजस्थानच्या अजमेर,
पाली आणि राजसमंदमध्ये सीएनजीचा दर 79.38 रुपये प्रति किलो झाला आहे.आज पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये दरात बदल झालेला नाही. देशाची
राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
कोलकाता बद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेल 99.83 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय
चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.