Monday, May 23, 2022

खा सुजय विखे म्हणाले माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो आणि आमच्यावर अन्याय झाला तर मिनिटात पलटी मारतो,’ या आपल्या विधानावरून टीका सुरू झाल्यानं

अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आपलं हे विधान मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडींसंबंधी होतं.

सध्या आपण भाजपमध्ये समाधानी आहोत,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे,काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील

एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी हे विधान केलं होतं. डॉ. विखे पाटील अशा बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. मात्र, यावेळी त्यांच्या या वक्तव्याची विरोधी पक्षापेक्षा त्यांच्याच पक्षात

चर्चा सुरू झाली. भाजपनं सुरू केलेल्या मिशन २०२४ मध्ये नगर जिल्ह्याची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. त्यामुळं अहमदनगरचे विषय थेट त्यांच्यापर्यंत जात आहेत.

या पार्श्वभूमीवर आज डॉ. विखे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत हा विषयला आता पूर्णविराम देत असल्याचं म्हटलं आहे.डॉ. विखे पाटील यांनी म्हटलं आहे, ‘माझे ते विधान मागील लोकसभा निवडणुकीच्या

पार्श्‍वभूमीवर घडलेल्‍या राजकीय घडामोडींच्‍या संदर्भात होतं. मात्र याचा विपर्यास करुन, वेगळे अर्थ काढले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय जनता पक्षामध्‍ये चांगलं काम करण्‍याची

संधी मिळाली आहे. श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात बोलताना केलेल्‍या वक्‍तव्‍याचा माध्‍यमांमधून विपर्यास केला गेला होता. प्रत्यक्षात त्या भाषणात २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीकडून

उमेदवारी मिळविताना ज्‍या पध्‍दतीनं अन्याय झाला, हे आपण सांगत होतो. परंतू त्‍या वक्‍तव्‍याचा विपर्यास करुन प्रसारमाध्‍यमांनी चुकीचा अर्थ काढला असे विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!