नेवासा
स्वत: सर्व प्रकारचे कष्ट सहन करून समाजात सर्व प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असतात असे प्रतिपादन देवगडं संस्थानचे भास्कगिरीजी महाराज यांनी केले.
नेवाशाच्या इतिहासात प्रथमच पत्रकारांनी सुरू केलेल्या प्रेस क्लबच्या कार्यालयाचा शुभारंभ भास्कगिरी महाराज याच्या हस्ते झाला,त्या प्रसंगी बोलत होते. शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज,महंत योगी ऋषीनाथ महाराज, महंत योगी गोपालनंद गिरीजी महाराज,माजी आ. पांडुरंग अभंग,माजी आ. बाळासाहेब मुरकुटे , विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
नेवासा प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले तर संस्थापक अध्यक्ष गुरूप्रसाद देशपांडे यांनी प्रास्तविकात सदरचे कार्यालय सर्वांसाठी उपयोगी राहणार असून पुढील काळात पत्रकार संघाच्या स्वमालकीच्या इमारतीत जाण्यासाठी समाजाने व प्रशासनाने सर्व प्रकारचा पाठींबा देण्याचे आव्हान केले.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड व कैलास शिंदे, शाम मापारी, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, शंकर नाबदे, पवन गरुड,नानासाहेब पवार, अभिषेक गाडेकर, वतीने धार्मिक, सामजिक, व राजकीय क्षेत्रातील कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
भास्करगिरी महाराज मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, प्रेस क्लबच्या या कार्यलयातूं समाजाला दिशा देणाऱ्या तसेच
सामाजिक भान वाढविण्यासाठी कार्य होईल. तसेच नेवासा संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पुण्य भूमित रहात असताना स्वछता व सामाजिक सलोखा याचा पूर्वजांनी दिलेला सुविचाराचा वसा जपण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्म कर्तव्य म्हणून करावे.
सामजिक राजकिय समाज सुधारक धार्मिक क्षेत्रात काम करणारे विविध कार्यक्रमातूं समाजात हिताचे काम करत असतात ते ते कार्य समाज मनाच्या पटलावर आणण्याचे कामं पत्रकार मंडळी करत असतात. समाजाच्या कानापासून ते मनापर्यत रुजविण्याचे कार्य करताना देश प्रेम व समाजप्रति प्रेम रूढ करण्यासाठी माध्यमांनी कार्य करावे. व्यवस्थेचे दूर व्यवस्थेकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी पत्रकारांना वैयक्तिक जीवनामध्ये चढउतार व सुख दुःखाचा सामना करावा लागतो. आपण गेले सातशे वर्ष पारतंत्र्य भोगले आहे, हि वेळ पुन्हा येऊ नये. देश आभिमान व स्वाभिमान बाळगावा दुर्गुनांपेक्षा सगुणाची सर्वांच्या अंतःकरणात वाढावी म्हणून पत्रकारानी कार्य करावे.
जेष्ठ पत्रकार विजय गांधी, बाळासाहेब तनपुरे, बाळकृष्ण पुरोहित, कमलेश गायकवाड, रवींद्र शेरकर,डॉ. करण घुले,सतिष पिंपळे, अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, राजेंद्र गायकवाड, सुनील वाघ, आसिफ पठाण, ईमरान दारुवाला, राजेंद्र मापारी, आशिष कावरे, बाबा गायकवाड, माऊली पेचे , केतन काळे, अनिल गव्हाणे, सोपान गायकवाड, पी.आर. जाधव , भरतकुमार उदावत, महेश देवढे, संभाजी पवार, संभाजी ठाणगे, राम घोलप, अजित नरुला, सतिष मुळे, बाबुराव ढवळे, तुळशीराम गीते, सुदाम बनसोडे, नितीन खंडागळे, ऋषभ तलवार, नितीन ढवळे, सुनील जाधव, राजेंद्र लोखंडे, जालिंदर गवळी, जयदीप जामदार, महेश मापारी, काका गायके, सतिष गायके, अशोक ढगे, शिवाजीराव कोलते यांच्या सह सर्व क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.
अशोक डहाळे यांनी सूत्रसंचालन केले.रमेश शिंदे यांनी आभार मानले.