Wednesday, May 25, 2022

‘प्ले बॉय’ बनायला गेला अन् घडले भलतच ;पुण्यातला तो तरुण पुन्हा नाव घेणार नाही

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चक्क प्ले बॉय होण्याच्या नादात एका तरुणाने एक नाही दोन नाही तर तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावले आहेत. शेवटी तेलही गेलं अन् तूपही गेलं अशी या तरुणाची अवस्था झाली आहे.

याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दयाशंकर मिश्रा, रागिणी, विक्रम सिंग व त्याचे साथीदार यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी आयटी अ‍ॅक्टनुसार

गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 जुलै ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण हा उच्चशिक्षित असून त्याचे

बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सध्या तो बेरोजगार आहे. मुळचा तो सोलापूर जिल्ह्यातील असून, वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

वडिलांचे निवृत्तीवेतन मिळाले होते. तेच पैसे आई सोबत खोटे बोलून शेअर मार्केट व इतर ठिकाणी गुंतवणूक करतो असे सांगून त्याने सायबर चोरट्यांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे. 25 जुलै 2021 रोजी फिर्यादी

तरुणाला त्याच्या फेसबुकवर प्ले बॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी तसेच मेंबर होण्यासाठी इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिसेस या संकेतस्थळावर नोंदणी करा अशी जाहिरात दिसली होती. तसेच

एक ते दोन तासांत अडीच ते तीन हजार रुपये कमवा असे प्रलोभनदेखील दाखविण्यात आले होते.सायबर चोरट्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी तरुणाने दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणाला त्यांच्या जाळ्यात खेचून परवाना फी, खोली भाडे, पोलिस पडताळणी, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलिसीची रक्कम व त्याची लेट फी अशी विविध कारणे सांगून वेळोवेळी 17 लाख 38 हजार

822 रुपये भरण्यास सांगितले. तरुणानेदेखील सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे फोन पे द्वारे पैसे हवाली केले. दरम्यान, पैसे भरल्यानंतरदेखील कोणताच मोबदला मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर

फसवणूक झाल्याचे तरुणाला समजले. त्यानुसार त्याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!