Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांने दिला राज ठाकरेंना हा सल्ला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे. भाजप जवळ गेलेल्या नेत्याला आणि पक्षाला संपवतात हा

इतिहास, राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, असं आमदार रोहित पवार म्हणाले. शब्द मोजून आणि जपून वापरले पाहिजेत. सातत्याने शिवराळ भाषा वापरणाच्या मागच्या शिवसेना नेते संजय राऊत

यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी पाठराखण केली.महाराष्ट्रात भाजपला आणण्यात शिवसेनाच जबाबदार आहे. पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला पुन्हा संपवण्याचा

प्रकार सुरू केला आहे. आता ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी सलगी वाढवत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला. कर्जत जामखेड या

त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवास भूमिपूजनासाठी आज रोहित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.राज ठाकरे आता जातीय तेढ

निर्माण करणारी भाजपाची भाषा करत आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंव्हा पक्षाला संपवले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत, असं रोहित पावर राज ठाकरेंना म्हणाले.

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असभ्या आणि खालच्या

भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरही रोहित पवार बोलले. संजय राऊत यांनी भावनिक होऊन शब्द वापरले. त्यांच्या

शब्दापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.’ईडी’ने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने

भावना व्यक्त केली असली तरी बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!