माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाचा 42 वा स्थापना दिवसा निमित्त काल ( बुधवारी ) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
या प्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नाव न घेता ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंवर टीका केली.शिवाजी कर्डिले म्हणाले, राहुरी तालुक्यात भाजपच्या काळात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे
श्रेय घेण्याचे काम सध्या सुरू आहे. राहुरी शहरात 1973 पासून एकही पाणी योजना झाली नाही. भाजपच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी शहरातील पाणीयोजनेच्या मंजुरीचे पत्र दिले.
योजनेचे बहुतांशी काम भाजपच्या काळातच झाले आहे. मागील महिन्यात ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी भरून, पाणी योजना चालू करून घेतल्या. त्याचे श्रेय घेण्याचे काम मंत्र्यांनी केले, असा आरोपही त्यांनी केली.
कर्डिले पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनातर्फे अनेक लोकहिताच्या योजना राबविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळत आहे. या कामांचे श्रेय घेण्याचे काम
राज्यातील मंत्री करत आहेत, अशी कर्डिले यांनी नाव न घेता टीका केली.भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे होते. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा सरचिटणीस
दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, सुरेश बनकर, दत्तात्रय ढूस, सूरसिंग पवार, महेंद्र तांबे, नानासाहेब गागरे, उत्तम आढाव, गोरक्षनाथ तारडे, रवींद्र म्हसे, सर्जेराव घाडगे, सुकुमार पवार उपस्थित होते.