Monday, May 23, 2022

सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात उभारणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील विजेच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्याला अतिरिक्त २५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.

यासाठी राज्यात सौर ऊर्जा पार्कची उभारणी केली जाणार आहे. महानिर्मिती अर्थात महाजेनको कंपनी एनटीपीसी लिमिटेडसोबत संयुक्तपणे कंपनी स्थापन करून त्यामार्फत हे सौर ऊर्जा पार्क उभारलं

जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी

स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५० टक्के भांडवली गुंतवणूक भागीदारीवर

ही संयुक्त कंपनी स्थापन केली जाईल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे.राज्य सुकाणू अभिकरण समितीवर राज्य शासनाच्या

अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क इ. केंद्र

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुज्ञेय करण्यात आले आहे.अपारंपरिक ऊर्जेसाठी १७३६० मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प २१ मार्च २०२५ पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी

१२९३० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या ९३०५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून २१२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!