माय महाराष्ट्र न्यूज:सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी बाळ ज. बोठे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपी बाठ बोठे यांने औरंगाबाद खंडपीठात जामीन
अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजुचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिल्याची माहिती आहे. रेखा जरे यांच्या हत्येला दीड वर्ष उलटून गेले. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत
पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी बाळ बोठे असून घटनेनंतर तीन महिने बोठे फरार होता. त्याला अटक केल्यानंतर सुरुवातीला पोलिस कोठडीमध्ये आणि नंतर
न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आरोपी बोठे याने नगर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बोठेने औरंगाबाद खंडपीठापुढे जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन्ही बाजुंनी युक्तीवाद झाला. युक्तीवादानंतर औरगांबाद खंडपीठने बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.