माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माहिजळगाव आणि पाटेगाव शिवेवर स्थापलिंग मंदिराच्या लागत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला . गुरुवारी सकाळी दहा
वाजेच्या सुमारास माहिजळगावच्या दिशेने दूध घालण्यासाठी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना रस्त्यालगत मृतदेह आढळून आला . झाडाखाली हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील
हनुमंत शिंदे यांना दिली . त्यानंतर याबाबत कर्जत पोलिसांना कळविण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दादा शिंदे यांनी . ग्रामस्थांकडून माहिती कळताच हनुमंत शिंदे हे घटनास्थळी गेले . त्यावेळी
त्यांना झाडाखाली मृतदेह असल्याची खात्री झाली . शिंदे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी संपर्क साधला.अज्ञात मृत व्यक्ती नेमका कोण ? त्याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला ? हा
घातपात आहे की आणखी काही याबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे . मृतदेह या भागात आणून टाकला की येथेच खून करण्यात आला हे पोलीस तपासात निष्पन्न होईल .
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव , पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले आहेत . कर्जत पोलीस पुढील तपास केला जात आहे .