माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माहिजळगाव आणि पाटेगाव शिवेवर स्थापलिंग मंदिराच्या लागत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला . गुरुवारी सकाळी दहा
वाजेच्या सुमारास माहिजळगावच्या दिशेने दूध घालण्यासाठी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना रस्त्यालगत मृतदेह आढळून आला . झाडाखाली हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील
हनुमंत शिंदे यांना दिली . अज्ञात मृत व्यक्ती नेमका कोण ? त्याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला ? हा घातपात आहे की आणखी काही याबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
जिल्ह्यात अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवासी व चासनळीचे व्यावसायिक अल्लाउद्दीन खाटीक यांचा मृतदेह नगर-नाशिकच्या सर हद्दीलगत
देवगाव शिवारात आढळल्याने खळबळ उडाली आहे.अल्लाउद्दीन खाटीक चासनळी येथे बोकडाचा व्यवसाय करतात बोकड खरेदी निमित्त सायखेडा येथून येत असताना देवगाव-कानळद
रस्त्यावर देवगाव शिवारात पडीत जमिनीमध्ये त्यांची मोटारसायकल व त्यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांच्या चौकशीअंती त्यांच्याकडे दहा-बारा लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे कळते.
अल्लाउद्दीन खाटीक यांनी राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे उप अध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे.