भेंडा प्रतिनिधी :कामगार राज्यमंत्री मंत्री बच्चुभाऊ कडू याच्या दालनात आज गुरुवारी साईबाबा संस्थान मधील 1700 आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून त्यांना 40%पगार वाढ करावी व साईबाबा संस्थांच्या सर्व योजना यांना लागू व्हावे यासंदर्भात मिटीग संपन्न झाली.
यावेळी कामगार विभागीय आयुक्त नाशिक श्री माळी , नितीन कावले अहमदनगर साहाय्यक आयुक्त, साईबाबा संस्थान प्रशासकिय अधिकारी, प्रहार अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे ,
प्रहार शिर्डी शहराध्यक्ष – अमोल बनाईत , राहता तालुका युवक अध्यक्ष विजय भाऊ काकडे शिर्डी साई संस्थान कर्मचारी सोमनाथ जाधव, तसेच आउटसोर्स कर्मचारी प्रतिनिधी – मंडलिक अरूण,
मोरे राजेंद्र,संतोष गायकवाड, पगारे गणेश, पगारे विकास, उपस्थित होते या मिटीग मध्ये कामगार मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी कर्मचारी यांच्या मागण्या समजावून घेतल्या.
दरम्यान प्रहार जनशक्ती राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डी देवस्थानच्या मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यात म्हटले आहे की गेल्या १० ते १३ वर्षांपासुन द्वारावती भक्तनिवास , साईआश्रम भक्तनिवास ,
प्रसादालय विभाग , हॉस्पिटल विभाग , साईधर्मशाळा विभाग कंत्राट पद्धतीने काम करतात , या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार व त्याच संस्थान मध्ये इनसोर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार व सुविधा यामध्ये
मोठी तफावत आहे . संस्थान मध्ये काम करणाऱ्या इनसोर्स कर्मचारी यांना कर्मचारी संबोधण्यात येते परंतू या कामगारांना अशी कुठलिही ओळख दिली जात नाही . कर्मचान्यांच्या आजाराच्या वेळेस ज्या सुविधा असतात त्यात देखील मोठी तफावत आहे .
किमान वेतन कायद्यानुसार व समान काम समान वेतन पगार व ४ पगारी सुट्या न देता या सर्व बाबीला हरताळी फासला जात आहे . २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांना ४० % वेतन वाढ मंजुर करण्यात आल्या होत्या . परंतू तात्काळ त्या रद्द केल्या . प्रत्यक्षात ८००० ते ९ ००० पगार दिला जातो .
ही बाब पिळवणुक करणारी आहे . वरील निवेदनातील बाबी पाहता कामगार विभागाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत आहे . त्याचबरोबर राज्यघटनेने जो मुलभुत अधिकारी दिला जातो तो डावलल्या जात आहे . तरी आपणाकडुन या प्रामाणिक कामगारांना न्याय मिळून देण्यात यावा ही विनंती .
सर्व आऊटसोर्स कर्मचारी यांना संस्थान मध्ये कायमस्वरूपी करण्यात यावे . नविन भरती प्रक्रिया बंद करण्यात यावी . श्री साईबाबा संस्थान मध्ये सर्व आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना सामावुन घ्या . कंत्राटदार
आर्थिक पिळवणुक करतात . श्री साईबाबा संस्थान ने कंत्राटदार हटवा , भक्तांचे पैसे वाचवा कंत्राटी कामगार पद्धत बंद करा . संस्थानने कंत्राटदार बाहेर काढले पाहिजे . कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणुक होते . त्यांच्या पि.एफ. मध्ये भ्रष्टाचार होतो .
खंडणी प्रमाणे घटना घडुन येतात . ज्या कामगाराने तक्रार केल्यास त्यांना कामावरून कमी करण्यात येते . १०० % महागाई वाढली तरी कर्मचारी जिद धोक्यात घालून काम करतो . वरील निवेदनातील बाबी पाहता कामगार विभागाने दिलेल्या कायदेशीर कायद्याची पायमल्ली होत आहे .
त्याचबरोबर राज्यघनेने जो अधिकार दिला आहे तो डावलला जात आहे . या सर्व बाबींची सखोल चौकशी करून १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा . अन्यथा प्रहार जनशक्ती
पक्षाच्या वतीने सर्व कंत्राटी कर्मचारी ( आऊटसोर्स ) सोबत घेऊन तिव्र आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.