माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर: राहुल कोळसे: भेंडा 6 जून:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय नेते व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात भारत राष्ट्र समितीचे ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा, कोअर कमिटी स्थापना अभियान (मुख्य शाखा, किसान सेल, युवक सेल, महिला सेल, एस सी सेल, एस टी सेल, अल्पसंख्याक सेल, कामगार सेल आदी), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी, विधानसभा निवडणुकीची तयारी, पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान आणि प्रचार या संबंधाने चर्चा झाली हे काम कशाप्रकारे सुरू आहे.
या संदर्भात भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते माजी आमदार शंकर धोंडगे, नाशिक विभागाचे समन्वयक दशरथजी सावंत व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वात नाशिक विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयकांची बैठक नाशिक शहरात पार पडली. यावेळी भारत राष्ट्र समितीचे किसान रथाचे प्रचार प्रसार, संघटन बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आली.
येत्या काळात नाशिक जिल्ह्यातील अनेक राजकीय आजी माजी लोकप्रतिनिधी यांचे भेटीगाठी घेतल्या. नाशिक जिल्ह्यातील काही दिग्गज नेते ,लोकप्रतिनिधी लवकरच बीआरएस मध्ये दाखल होणार असून अन्य काही नेते बीआरएस चे संपर्कात असल्याची माहिती दिली.
या बैठकीला भारत राष्ट्र समितीचे राम निकम, सोमनाथ बोराडे, डॉ. अनिल पवार, डॉ. बिलाल शेख, संदीप खुटे, चंद्रकांत बच्छाव, विकी देशमुख, विशाल निकम, सलीम शेख, अनिल भाऊ महाजन, समाधान बाविस्कर, तसेच भारत राष्ट्र समितीचे नाशिक विभागातील जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर शंकर अण्णा धोंडगे, दशरथ सावंत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांच्या उपस्थितीत नाशिक विभागातील जिल्ह्यांमधून आलेले कार्यकर्ते व काही माजी नगरसेवकांनी बीआरएस पार्टीमध्ये प्रवेश केला.
[ नानासाहेब बच्छाव यांचे नाशिक शहरातील कार्यालयाचे उद्घाटन
भारत राष्ट्र किसान समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांचे नाशिक शहरातील कार्यालयाचे उद्घाटन भारत राष्ट्र समितीचे शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व भारत राष्ट्र समितीचे नाशिक विभागीय समन्वय माननीय दशरथजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ]