Wednesday, May 25, 2022

शारीरिक संबंधास नकार कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य, तरुणीला..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भरतपूरमध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने या मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास

नकार दिल्याने त्यांनी तिला विष पाजलं. मृत विद्यार्थीनीच्या वडिलांनी आरोप केला आहे, की आरोपी मुले त्यांच्या मुलीला सामूहिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होते. परंतु मुलीने

नकार दिल्याने तिला विष देऊन ठार मारण्यात आलं.या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला विष पाजण्याचं एकमेव कारण म्हणजे तिने त्या मुलांसोबत शारीरिक संबंध

ठेवण्यास नकार दिला होता. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हलेना पोलीस स्टेशनमध्ये घटनेसंदर्भात एफआयआर दाखल केलं असलं तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात

पोलिसांना यश आलेलं नाही.पीडितेच्या वडिलांनी एफआयआरमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती. तिथे तिच्यासोबत शिकणारे पाच

विद्यार्थी तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते. जेव्हा पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी तिला विष पाजून तिची हत्या केली.घटनेच्या संदर्भात हलेना पोलीस स्टेशनचे प्रभारी

विजय सिंह यांनी सांगितलं की, बुधवारी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), 328 (विष देऊन दुखापत करणे) आणि 341 (अयोग्य कृत्ये) अंतर्गत

आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र सर्व आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असंही ते म्हणाले.

यासोबतच स्टेशन प्रभारी विजय सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिचा व्हिसेरा सॅम्पल जतन करण्यात आला असून तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी

पाठवण्यात आला आहे. पोलिसही फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ही विद्यार्थिनी हलेना शहरात

आजी-आजोबांसोबत राहत होती. तिने मंगळवारी आईला फोन करून सांगितलं की, काही महाविद्यालयीन मुलं तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!