माय महाराष्ट्र न्यूज:राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल शुक्रवारी ५३३४ गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक १३०० रुपये प्रतिक्विंटलला
भाव मिळाला. तर सोयाबीनला ७२९८ रुपये इतका भाव मिळाला. कोल्हार येथील उपआवारात ७३०० रुपये भाव मिळाला.राहाता बाजार समितीत काल ५ हजार ३३४ कांदा गोणी आवक झाली.
कांदा नंबर १ ला १००० रुपये ते ते १३०० रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर २ ला प्रतिक्विंटलला ५५० ते ९५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला २०० ते ५०० रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा ६०० ते ८०० रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला १०० ते २०० रुपये भाव मिळाला.सोयाबीनला कमीत कमी ७२७६ रुपये तर जास्तीत जास्त ७२९८ रुपये व सरासरी ७२८५ रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
गव्हाला सरासरी २१३० रुपये असा भाव मिळाला. हरभरा कमीत कमी ४५४० रुपये, जास्तीत जास्त ४५७५ रुपये तर सरासरी ४५६० रुपये असा भाव मिळाला. तुरीला कमीत कमी ५४०० रुपये,
जास्तीत जास्त ५५०० रुपये तर सरासरी ५४५० इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.बाजार समितीची उपशाखा कोल्हार येथील आवारात सोयाबीनला
कमीत कमी ७२८६ रुपये, जास्तीत जास्त ७३०० रुपये तर सरासरी ७२९० रुपये इतका भाव मिळाला.