माय महाराष्ट्र न्यूज:कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातील कामांसोबतच राज्यभर दौरे करून कामाची छाप उमटविलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्ष लवकरच
राज्यस्तरावरील मोठी जबाबदारी सोपविणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचे संकेत आज जामखेडमध्ये दिले. पवार यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करून पाटील म्हणाले
रोहित पवार यांना पक्षाचे काम वाढवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवायचे आहे.जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परिवार संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात कुठलाच आमदार रोहित पवार यांच्यासारखे नियोजनबद्ध काम करु शकत नाही. त्यामुळे रोहित पवार यांना पक्षाचे काम वाढवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवायचे आहे.
कर्जत जामखेड तालुक्यात विकास कामे वेगाने होत आहेत. ही कामे होत आसताना मी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.पाटील पुढे म्हणाले, ’ देशात महाराष्ट्रातच ईडीकडून सर्वाधिक कारवाया केल्या जात आहेत.
महाविकास अघाडीला अडचणीत आणण्याचे काम त्यातून केले जात आहे. मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फसला आहे. महागाईसंबंधी पंतप्रधान कधीच बोलत नाहीत. वाढत्या महागाईतही आपली
अर्थव्यवस्था टिकून आहे याचे कारण म्हणजे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले नियोजन आणि अर्थनितीमुळे हे शक्य झाले आहे,’ असेही पाटील म्हणाले.आमदार रोहित पवार म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार समजले पाहिजेत. हे विचार कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे पवार म्हणाले.