Tuesday, May 24, 2022

कोरोना रुग्णसंख्येनं वाढलीये चिंता! महाराष्ट्रासह केंद्राचं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या एक्सई या नव्या उपविषाणूची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांना पत्र पाठवलं असून, सतर्क

राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यातील नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम या राज्यांना पत्र पाठवलं आहे. पत्रात वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना भूषण यांनी

म्हटलं आहे की, कोरोनाच्या नव्याने वाढत्या रुग्णसंख्येवर नजर ठेवली जावी. त्याचबरोबर गरज निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.केंद्र सरकारने १८ वर्षांवरील वयोगटातील

सर्वांसाठी बुस्टर डोस घेण्यास परवानगी दिली असून, केंद्रीय सचिव राजेश भूषण शनिवारी सकाळ १०.३० वाजता बुस्टर डोज संदर्भात एक बैठकही घेणार आहेत.

केंद्र सरकारने अखेर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बुस्टर डोज देण्यास परवानगी दिली आहे. बुस्टर डोज सर्व खासगी केंद्रावर उपलब्ध असणार आहे. तर सरकारी केंद्रावरून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रामध्ये

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी बुस्टर डोज देण्याची सुविधा सुरू राहणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे १८ वर्षांपुढील सर्व नागरिक

खासगी लसीकरण केंद्रावर जाऊन बुस्टर डोज घेऊ शकणार आहेत. १८ वर्षांपुढील व्यक्ती ज्यांनी दुसरा डोज घेतला आहे आणि त्याला ९ महिने पुर्ण झाले आहेत अशा व्यक्ती बुस्टर डोज घेऊ शकणार आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!