Saturday, September 23, 2023

शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा मिळावा-गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर/सुखदेव फुलारी

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे. त्यामुळे कंपन्या प्रमाणे शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळू शकेल असा आशावाद गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.

माजी खा.स्व.गोविंदराव आदिक यांच्या ८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीरामपुर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात गुरुमाउली बोलत होते.प्रारंभी भारत माता व माजी खा.स्व.गोविंदराव आदिक यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक, श्रीमती पुष्पलता आदिक व आदिक कुटुंबीयांच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे संत पूजन करण्यात आले.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे पुढे म्हणाले,संस्कारातुन संस्कृतीचे संवर्धन होऊन समृद्ध राष्ट्र निर्माण होते. त्यासाठी घराघरांत नित्याने संस्काराचे पाठ सुरू ठेवण्याची गरज आहे.
आपण स्वामींच्या कार्याद्वारे २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के सामाजिक कार्य करीत असून मानवाच्या सर्वांगीण केंद्रस्थानी ठेऊन मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे अविरत कार्य भक्तगणांच्या माध्यमातून अनेक आयामांद्वारे नेटाने करीत आहोत. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने केवळ नोकरीसाठी शिक्षण हा संकुचित विचार मनातून घालविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत शेतीला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.
हरित क्रांतीतून अनावश्यक गरजा अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे कॅन्सरची निर्मिती झाली. त्यासाठी आता सर्वत्र सेंद्रिय शेतीची गरज आहे. अखंड ब्रम्हांडासाठी अन्नधान्य पिकाविणारा शेतकरी हाच खरा ब्राम्हण आहे. असे सांगून त्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या विविध विभागाची माहिती दिली. ज्ञान हे केवळ मस्तकरुपी नको तर ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास श्रीमती मिनाताई जगधने, अंजली आदिक-पुनातर, आर्यमन आदिक, अद्वैत आदिक, आ. लहू कानडे, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, इंद्रनाथ थोरात, अशोक कानडे, नितिन पवार,भाऊसाहेब ठोंबरे, बापूसाहेब आदिक, सचिन गुजर, कैलास बोर्डे, अशोक थोरे, अॅड. अजित काळे, सुरेश बनकर, डॉ. रविंद्र जगधने, सुनील थोरात, प्रशांत खंडागळे, संजय छल्लारे, सुधिर वायखिंडे, नितिन गवारे, आशिष बोरावके, ज्ञानेश्वर मुरकुटे, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, विशाल पोफळे, विलास भांगडे, संतोष भागडे, विराज भोसले, संपत नेमाणे, अर्चना पानसरे, जयश्री जगताप, प्रियंका जनवेजा, सोनल मुथ्था, सुभाष त्रिभुवन, संदीप मगर,राजदीप जाधव, योगेश जाधव, भाऊ डाकले, सोमनाथ गांगड, मुरलीधर ठोंबरे, भागचंद औताडे, विजय डावखर, बाळासाहेब हरदास, रवि गरेला, साजिद मिर्झा, आदित्य आदिक, अर्जुन आदिक, आदी उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणिय होती.

माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्वागत केले. अविनाश आदिक यांनी प्रास्ताविक केले. अड. जयंत चौधरी यांनी आभार मानले. महाप्रसादाने मेळाव्याची सांगता झाली.

*शेती विषय स्व.आदिकांचा जीव की प्राण….

दिवंगत खा. गोविंदराव आदिक यांनी सतेच्या माध्यमातून कृषी विभागासाठी धोरणात्मक काम केले. कृषक समाजाच्या उद्धारासाठी शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ दिले. शेतीला चांगले दिवस कसे येतील यावर त्यांनी सतत चिंतन आणि मंथन केले, शेती हा विषय त्यांचा जीव की प्राण होता या विषयाद्वारे ते आपणांशी जोडलेले होते. म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर मनात आहे.
-गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!