माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव सुरू आहे. बन्सी महाराज तांबे ,महंत भास्करगिरीजी महाराज ,
ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने व महंत सुलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महंत गोपाल नंदगिरी महाराज व हरिभक्त परायण मंगेश महाराज वाघ यांच्या उपस्थितीत सप्ताह होत आहे.
गेल्या 18 वर्षांपासून या पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे या कीर्तन महोत्सवात भास्करगिरीजी महाराज व उद्धवजी महाराज मंडलिक यांनी सदिच्छा भेट दिली आहे या सप्ताह साठी गावातील व गावातील परिसराचा मोठं योगदान आहे.
शुक्रवार सायंकाळी चार वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक होईल व शनिवारी सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त पारायण रामायणाचार्य वैभव महाराज माळवदे यांच्या काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे या सोहळ्याची सांगता होणार आहे
महाप्रसाद पंगतीसाठी कै बबनराव वाघ मेजर यांच्या स्मरणार्थ श्री दादासाहेब वाघ , मातोश्री कै शकुंतला संपतराव निक्रड यांच्या स्मरणार्थ श्री भगवानराव जाधव तसेच किशोर सुकळकर साई समर्थ ॲग्रो इंडस्ट्रीज , श्री रंगनाथ किसन सानप यांचे या दिवशी महाप्रसाद पंगत आहे.