माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भाजपचे पंचायत समिती सदस्य तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे अजित मुरकुटे यांचा मृदा व जलसंधारण
मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ शिवाजी शिंदे, नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मागील काही काळापासून नेवासा तालुक्यामध्ये भाजपची पडझड पाहता व बाळासाहेब मुरकुटे यांचा जनतेशी संपर्क कमी प्रमाणात दिसून येत असल्याने अनेक कार्यकर्ते भाजपच्या गटातून शिवसेनेच्या
गटामध्ये दाखल होताना दिसत आहे परंतु आज चक्क बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे कट्टर भाजपचे समर्थक असलेले अजित मुरकुटे आज शिवसेनेच्या गटामध्ये सामील होताना दिसत आहे .
त्यामुळे पुढील काळात भाजपची अजून किती पडझड होणार हे चित्र आलेला काळच ठरवणार? अजित मुरकुटे हे मागील पंचवार्षिकला पंचायत समितीच्या भेंडा गणातून निवडून आले होते.
अजित मुरकुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीमध्ये ना. गडाख यांच्या सोनई येथील निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.या प्रसंगी देवगाव
येथील सामाजिक कार्यकर्ते ताराचंद ठोंबरे, शब्बीर भाई सय्यद, महेश निकम ,तसेच शरद कदम देवगाव येथील कार्यकर्ते या प्रवेशाच्या वेळी उपस्थित होते .