Tuesday, May 24, 2022

एका रात्रीसाठी तुझी पत्नी … बदलीच्या बदल्यात अभियंत्याची विचित्र मागणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एक धक्कादायक बातामी समोर आली आहे. येथील वीज विभागातील एक लाईनमन बदलीची मागणी करत होता. मात्र, कनिष्ठ अभियंत्याने (जेई) त्याच्यासमोर लाजिरवाणी अट घातली.

जेई म्हणाला की, जेव्हा तो त्याच्या पत्नीला त्याच्या स्वाधीन करेल तेव्हाच लाईनमनची बदली होईल. या अटीमुळे लाईनमन इतका दुखावला गेला की, त्याने घरी येऊन डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

यानंतर ्त्याच्या नातेवाईकांनी त्याला लखीमपूरला घेऊन गेले. तेथून त्याला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले. मात्र, मरण्यापूर्वी लाइनमनने जेईविरोधात निवेदन दिले आहे.

लाईनमनने आरोप केला आहे की, जेई आणि त्याच्या दलालाने बदली करण्याच्या बदल्यात पत्नीला मागितले. मी पोलीस ठाण्यातही नंबर देकर तक्रार दिली होती. मात्र, काहीच नाही झाले. दरम्यान, मृताचा परिवार

लखनऊ येथे आहे. अद्याप पोलिसांत तक्रार आलेली नाही. तथापि, डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी व्हिडिओची दखल घेतली आणि आरोपी जेईला निलंबित करण्याची शिफारस केली. तसेच

त्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले. सायंकाळी उशिरा अधीक्षक अभियंता राम शब्द यांनी आरोपी जेई नागेंद्र कुमार आणि टीजी-2 जगतपाल यांना निलंबित केले आहे.लखीमपूरच्या पलिया

येथे राहणारा गोकुळ यादव (वय-45) वीज विभागात लाईनमन होते. मात्र, त्यांची नोकरी एका वर्षापासून त्यांच्या घराच्या 50 किमी दूर अलीगंज येथे होती. त्याआधी ते महंगापूर येथे कार्यरत होते.

तेथे त्यांची ओळख जेई सोबत झाली होती. परिवारासंदर्भात गोकुळ मागील अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यामुळे त्यांना त्याची बदली आपल्या घराजवळ पलिया येथे करायची होती. यासंदर्भात त्याने

अधिकाऱ्यांशी बोलणी केली. मात्र, त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.यानंतर त्यांनी जेईला बदलीची मागणी केली. जेईने बदलीची जबाबदारी घेतली. मात्र, त्याबदल्यात जेई म्हणाला की, तु तुझ्या पत्नीला

एका रात्रीसाठी मला आणि माझ्या पत्नीला पाठवून दे. मी तुझी बदली करुन देईल. यानंतर गोकुळ परत आले. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. मात्र, काहीच कारवाई झाली नाही.

यानंतर गोकुळ यांनी शनिवारी पलिया येथील आपल्या घरात सायंकाळच्या सुमारास स्वत:वर डिझेल टाकून पेटवून घेतले.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!