Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार:पत्नी सुंदर दिसते म्हणून सहावर्षांपासून त्यांने तिला…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: बीड शहरातील एका महिलेच्या वाट्याला दु:ख ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ती दिसायला सुंदर होती इतकीच तिची चूक होती. सुंदर दिसते

म्हणून तिच्या पतीने तिला गेली चार वर्ष खोलीत डांबून ठेवलं. इतकंच नाही तर तिला जबर मारहाणही केली.बीड शहरातील जालना रोड भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रुपाली किन्हीकर असं या पीडित महिलेचं नाव असून तिला दोन मुलं आहेत. घरात राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची सामाजिक कायकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली. यावेळी तिची अवस्था पाहून

पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचं 20 वर्षांपूर्वी मनोज किन्हीकरशी लग्न झालं.

सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली, सुरुवातीची दोन-तीन वर्ष आनंदात गेली. पण त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. रुपाली एका

दुकानात कामाला जात होती. मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने त्याने तिचं कामावर जाणं बंद केलं. त्यानंतर मनोजने रुपालीचं घराबाहेर पडणंही बंद करुन टाकलं. रुपाली सांगते, पाच-सहा वर्षांपूर्वी घराबाहेर पडले होतं.

पण त्यानंतर बाहेरचं जगच बघितलं नाही असं रुपालीने सांगितलं. इतकंच नाही तर वडीलांच्या अंत्यविधीला रुपालीला जाऊ देण्यात आलं नाही. पत्नीबरोबरच दोन मुलांनाही मनोजने खूप त्रास दिला.

रुपाली नावा सारखीच रुपाने सुंदर होती, पण या नराधमाने तिचे हाल केले. तरुणपणातच ती 80 वर्षांची दिसू लागल्याचं शेजारच्यांनी सांगितलं.रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर संशय

घेत होता. गेल्या 17 वर्षांपासून तिला मारहाण करत घरात डांबून ठेवलं रूपालीच्या अंगावरती अनेक जखमा आहेत, महिलेला चालता येत नाही.शिवाजी नगर पोलिस स्टेशनला तक्रार आल्यानंतर प्रत्यक्ष

घटनास्थळी गेले. त्या घरात माणूस पाच मिनिटं देखील थांबू शकत नाही इतका उग्र वास त्या घरात येत होता. अशा ठिकाणी पीडित महिला आणि तिची दोन मुलं राहात होती. पोलिसांनी

या महिलेची सुटका केली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!