Wednesday, May 25, 2022

महाराष्ट्रतील विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी ; उन्हाळी सुट्टी बाबत राज्य शासनाकडून परिपत्रक जारी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे.

तर 13 जून ला शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. विदर्भातील शाळांना 27 जून पर्यंत सुट्टी असणार आहे. शाळांना परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात निकाल घोषित करता येणार आहे. निकाल विद्यार्थी आणि पालकांपर्यंत

पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असणार आहे. राज्य शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला 2 मे

पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता येथील शाळा 27 जूनपासून सुरु होणार आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीचा विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात.

पण कोरोनामुळे 2 वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात आता शाळा सुरु झाल्या आहेत. ऑनलाईन वर्गानंतर आता प्रत्य़क्षात वर्ग भरु लागले आहेत.

कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्याचं आव्हान शिक्षक आणि शाळेपुढे असणार आहे.याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.

पण या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालक ही नाराज होते. त्यानंतर आता 2 मेपासून आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!