Thursday, October 5, 2023

नितीन जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

मंत्रालयीन जनसंपर्क अधिकारी तथा राजकीय सल्लागार नितीन जाधव यांना आईसाहेब प्रतिष्ठान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेमार्फत अतिशय मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या बुद्धीच्या,जिद्दीच्या,अभ्यासुवृत्तीच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील जनसंपर्क विषयक बातम्यांच्या कार्यामुळे त्यांचा महाराष्ट्रभर दांडगा जनसंपर्क वाढला असून सामाजिक राजकीय क्षेत्रात प्रभाव निर्माण झाला आहे. त्यांनी मंत्रालयातील मंत्री आस्थापनेवरील विविध जनसंपर्क विषयक कार्य बातम्यांच्या माध्यमातून विविध खात्यांचे उपक्रम, योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये खाजगी जनसंपर्क अधिकारी पदी उत्कृष्ट कार्य केल्याने अनेक योजनांचा लाभ जनसामान्यां पर्यंत पोहोचवण्यात त्यांची भूमिका राहिलेली आहे .

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख पदाच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मित्र बांधवांची कामे प्रसिद्धीच्या झोतात न येता पडदया अडून पूर्ण केली. ते विज्ञानासह व्यवस्थापन शास्त्र विषयाचे उच्च पदवीधर असल्याने व्यवस्थापनाचा त्यांना मोठा अनुभव आहे त्याचबरोबर संगणकतंत्रज्ञान, वृत्तपत्रविद्या विषयाची पदवी संपादन केल्यामुळे उत्कृष्ट पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाजप्रिय विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, उद्योजकीय क्षेत्रातील त्यांची पत्रकारिता गाजलेली आहे.नितीन जाधव यांनी उद्योगतज्ञ,मार्केटिंग तज्ञ,करिअर मार्गदर्शक,राजकीय सल्लागार, राजकीय विश्लेषक, लेखक,भाषणकार,सूत्रसंचालक, राजकीय रणनीतीकार अशा पद्धतीने अनेक क्षेत्रात वैविध्यपूर्ण वेगळी ओळख निर्माण केली. महायुती, महाआघाडी सरकारमध्ये विविध खात्यांच्या मंत्र्यांचा खाजगी जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्यात जलसंधारण, बहुजन कल्याण,अल्पसंख्यांक, कौशल्य व उद्योजकता विकास,आपत्ती व्यवस्थापन,भूकंप पुनर्वसन, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे मुख्यमंत्री कार्यालयाचे बातम्या विषयक कार्य याचा ही समावेश आहे.

सर्वच क्षेत्रातील मित्र,बांधवांचे सहकार्य मला नेहमीच होत आलेले आहे. सदरचा मिळालेला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मी माझे हितचिंतक,मित्र बांधव व मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी. सर्व पत्रकार मित्र, होतकरू क्रियाशील समाजसेवक यांना अर्पित करतो. या पुरस्कारामुळे मला सामाजिक.सांस्कृतिक. राजकीय क्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे मत
नितीन जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भोसले व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!