माय महाराष्ट्र न्यूज:या गोळ्यांना सामान्यपणे “मॉर्निंग आफ्टर पिल’ म्हणून ओळखले जाते. मुळात हा संप्रेरकांचा उच्च तीव्रतेचा डोस आहे. शरीराच्या संप्रेरकांच्या चक्रात हस्तक्षेप करून या
चक्रादरम्यान अंडाशयातून अंडे बाहेर पडण्यास प्रतिबंध केला जातो. मात्र, ही गोळी घेण्यापूर्वीच अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडले असेल तर ही पद्धत उपयोगी पडत नाही. त्याचप्रमाणे एका मासिक चक्रादरम्यान
दुसऱ्यांदा ही गोळी घेतल्यास तिचा काहीच उपयोग होत नाही. असुरक्षित शारीरिक संबंधानंतर 48 तासांच्या आत ही गोळी घेतली गेली तरच तिचा उपयोग होऊ शकतो.
कॉपर-टी हे असुरक्षित शारीरिक संबंधानंतर एकशे वीस तासांच्या आत या उपकरणांचा वापर केला असता गर्भधारणा टाळली जाण्याची शक्यता असते. अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील वापरामुळे
गर्भधारणेला प्रतिबंध केला जातो. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे जोपर्यंत हे गर्भनिरोधक उपकरण गर्भाशयातून काढले जात नाही तोपर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता नसते.
तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी कधीही घेऊ नये. यातील काही औषधे ही प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जात असली, तरी तुम्ही डॉक्टरांना भेटूनच ही औषधे घेणे आवश्यक आहे.
शरीरावर या गोळ्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या गोळ्या घेण्याची खरच गरज आहे का, याची चाचपणी करा. तुमच्या गरजा व प्राधान्यांविषयी डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करू शकता.
म्हणजे ते तुम्हाला योग्य असा दीर्घकालीन गर्भनिरोधकांचा इतर पर्याय सुचवू शकतात.काही स्त्रियांना आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी घेतल्यानंतर मळमळ किंवा उलटीचा त्रास होऊ शकतो.
गोळी घेतल्यानंतर तीन तासांच्या आत उलटी झाल्यास, डोस पुन्हा घेण्याची आवश्यकता असते. मासिक पाळीच्या चक्रात काही बदल होण्याची शक्यता असते.