माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे पत्नी व मुलाचा खून करणाऱ्या पतीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या रागातून त्याने हे दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पत्नी अक्षदा व मुलगा शिवतेज यांचा खून केल्यानंतर आरोपीने चाकण येथील मेव्हणा महेश
बोरावके याला व्हिडीओ कॉल करून घटनेची माहिती व मृत्युमुखी पडलेल्या पत्नी व मुलाचे मृतदेह दाखविले. तसेच, त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवरही टाकले. घटनेनंतर तो
पोलिसांत हजर झाला. घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अक्षदा हिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचाच राग बलरामच्या डोक्यात अनेक दिवसांपासून होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशय तालुका पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे
यांनी व्यक्त केला आहे. तसेच, बलराम हा लहानपणापासून जास्त बोलका नव्हता, तो फारसे कोणाशी बोलत नसायचा, असे त्याच्या शालेय मित्राकडून समजले.
रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, गोंधवणी येथील जीवन कुदळे यांचे घर जाळल्याप्रकरणी कोणीही तक्रार दिलेली नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही.
संबंधितांना तक्रार देण्याबाबत कळविल्याचे शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले आहे.