माय महाराष्ट्र न्यूज:राज ठाकरेंची ठाण्यातली सभा हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. ‘उत्तर सभा’ असं म्हटलेल्या या सभेमध्ये राज ठाकरे
त्यांच्या पाडवा सभेनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देणार होते. त्यामुळे त्याबद्दल मोठी उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलताना पवार कुटुंबावर आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी
काँग्रेसवर निशाणा साधला. यापैकी राज ठाकरेंच्या मुख्यत: निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. “शरद पवार हे स्वत: नास्तिक असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवण्याचा
प्रयत्न करत असतात”, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी शरद पवारांवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज उत्तर सभा ठाण्यात पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी
सभेला सुरवात करताना सुरवातीलाच राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष केलं आहे.
तसेच त्यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली आहे.यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती होती. मात्र त्यानंतर हा
धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. यानंतर १९९९ ला पुन्हा निवडणुकानंतर दोन महिन्याातच शरद पवारांनी भूमीका बदलली आणि पुन्हा काँग्रेससोबत युती करत ते देशाचे कृषीमंत्री झाले.
पण पुढे हे शरद पवार म्हणतात कि राज ठाकरेंनी भूमिका बदलल्या. पण राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली, असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच पुढे शरद पवार स्वत: नास्तिक आहेत.
त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.