माय महाराष्ट्र न्यूज: मंत्री शंकरराव गडाखांनी काल ( सोमवारी ) बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे व भाजपचे नेवासे तालुक्यातील एकमेव पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांचा शिवसेना
प्रवेश घडवून आणला त्यामुळे हा बाळासाहेब मुरकुटे यांना मोठा राजकीय धक्का समजला जात आहे.शिवसेना बळकट करण्यासाठी मंत्री गडाख राजकीय खेळी खेळत आहेत. नेवासे तालुक्यात भाजपचे
आउटगोईंग तर शिवसेनेचे इन कमिंग सुरू आहे.मंत्री गडाखांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 11) माजी आमदार मुरकुटेंचे पुतणे यांचा शिवसेना प्रवेश झाला. यावेळी मंत्री गडाखांनी त्यांचा
सत्कार करून शिवबंधन बांधले. अजित यांचा शिवसेना प्रवेशाने जिल्हा भाजपात विशेषतः मुरकुटे गटात मोठी खळबळ उडाली आहे.नेवासा तालुक्यातील माजी आमदार मुरकुटेंचे देवगाव, कुकाणे,
नेवासे बुद्रुक, शनिशिंगणापूर, बहिरवाडी, बेलपिंपळगाव आदी गावातील अनेक समर्थकांसह भाजप पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी त्यांच्या कार्येपद्धतीवर टीका करत मंत्री शंकरराव गडाखांचे नेतृत्वमान्य
करत शिवसेनेत दाखल झाले आहेत. आता तर त्यांच्या पुतण्यानेच शिवसेना प्रवेश केल्याने मुरकुटे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
दरम्यान, प्रवेश सोहळ्याप्रसंगी अजित मुरकुटेंसह अनेकांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर जोरदार टीका करतांना मुरकुटे यांनी राजकरण करत असताना कौटुंबिक हल्ले करू नये, मंत्री गडाख
यांना तात्विकवाद केला पाहिजे. परंतु आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचे राजकरण आता संपले असून अनेक वेळेस त्यांनी शब्द बदलले आहेत. त्यांची कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती आताही
दिसून येत आहे. आम्ही गाव पातळीवर प्रमाणिकपणे काम करायचे व यांनी विविध ठिकाणी अंधारात युती करायची असे अनेकदा यांच्याकडुन घडले आहे. या सर्व गोष्टीला कंटाळून आम्ही सर्वांनी भाजप
सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अजित मुरकुटे यांनी सांगितले.मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात माजी आमदार मुरकुटेंसाठी संघर्ष केला. मुरकुटे यांना साथ दिली. मात्र मागील काही
दिवसांपासून बाळासाहेब मुरकुटे यांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे सरळ राजकारण करत विकासासाठी प्रयत्नशील असलेले मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत
प्रवेश करून कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे व देवगाव व परिसरात संघटना बळकटी साठी प्रयत्नशील राहणार आहे असे अजित मुरकुटे म्हणाले .