माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला 1100 रुपये तर सोयाबिनला 7350 रुपये क्विंटल चा भाव मिळाला आहे.
कांद्याच्या एकूण 5173 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये, नंबर 2 ला 450 ते 750 रुपये, नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये, व जोड कांदा
100 ते 200 रुपये. सोयाबिनला कमीत कमी 7301, जास्तीत जास्त 7350 रुपये तर सरासरी 7325 रुपये भाव मिळाला.
तर संगमनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दि. 12 एप्रिल 2022 रोजी 16 हजार 706 कांदा गोणीची आवक झाली. एक नंबर कांद्यास 1221 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
नं. 1 – 1000 ते 1221 रुपये, नं. 2 ला 700 ते 900 रुपये, नं. 3 ला 600 ते 800 रुपये, गोल्टी 300 ते 700 रुपये, खाद 150 ते 351 रुपये या प्रमाणे बाजारभाव मिळाले आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये
आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या सलग पाच दिवशी शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत,
वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी बाजार समितीच्या आवारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सर्व संचालक मंडळ व सचिव सतिश गुंजाळ यांनी केले आहे.