माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्हीही पीएम किसान योजनेत नोंदणी केली असेल आणि ११ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. लक्षणीय बाब म्हणजे
अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. चला तर म जाणून घेऊया कोणत्या लोकांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, जे लोक आयकर भरतात त्यांना पीएम
किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही. याशिवाय डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेस्ट अशा व्यावसायिकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जे लोक पदापासून दूर झालेले आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय १४ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमच्याकडे २ हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणे देखील आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रूपयांची आर्थिक मदत देते. सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देते. म्हणजेच तुम्हाला ४ महिन्यांच्या फरकाने २००० रूपये मिळतात. हे पैसे थेट तुमच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले जातात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १० व्या हप्त्याचे पैसे १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला.