Thursday, October 5, 2023

शिवचरित्र हे यश कसं मिळवायचं हे शिकवते – शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे महाराज

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारदस्त आवाज..सुमधुर संगीत अन् त्याचा अत्यंत सूरबद्ध नियोजनाचा बाज आणि चौकात छत्रपतींच्या नावांच्या प्रचंड गगनभेदी घोषणा तसेच या शौर्यवरांच्या कार्याची माहिती ऐकण्यासाठी जमलेला प्रचंड अफाट जनसमुदाय यामुळे आष्टी शहरवासियांच्या मनात आत्मविश्वासाचा निर्माण झालेला उत्साह.

यामुळे आजचा शिवराज्याभिषेक दिन आष्टीकरांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत इतिहास निर्माण करणारा ठरला.शिवचरित्र हे संकटं दुर करणार नाही परंतु शिवचरित्र हे यश कसं मिळवायचं हे शिकवते असे शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे महाराज यांनी सांगितले.

समाजप्रबोधनकार शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांचा संपुर्ण महाराष्ट्राने गौरविलेला अनेक पुरस्कार प्राप्त अस्सल मराठी शिवगर्जना हा कार्यक्रम आज मंगळवार दि.६ जुन रोजी रात्री हा कार्यक्रम पार पडला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमांचे मान्यवरांसह शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांच्या शुभ हस्ते नतमस्तक होत पूजन करण्यात आले.यावेळी शिवशाहीरांच्या सत्कारानंतर प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या शाहिरीला सुरुवात झाली.

शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आष्टी येथे मंगळवार दि.६ जुन रोजी सायंकाळी ७ वा.शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे प्रस्तुत शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रम संपन्न झाला.आष्टी तालुक्यातील शिवभक्तांनी शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे प्रस्तुत शिवगर्जना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आष्टी यांनी केले होते.

या वाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्त्यांच्या गर्दीने मंडपासामोरील भव्य चौकसुद्धा अपुरा पडला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या.राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आष्टी शहरात मंगळवार दि.६ जून रोजी सकाळी ९ वा. ब्रम्हवृंदांच्या वेद मंत्रोउच्चाराने महाअभिषेक होणार करण्यात आला.महाभिषेक प्रसंगी संगमनेर येथील रूद्र प्रतिष्ठानच्या १५० युवक युवतीच्या ढोल

ताशा पथकाने शहर दुमदुमणाले.सायं. ७ वा. शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे प्रस्तुत शिवगर्जना कार्यक्रमाचे दमदार आयोजन झाले.हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी,शिवभक्तांनी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, सुनिल रेडकर,विजय गोल्हार, संजय मेहेर,संतोष गुंड, दत्ता काकडे, डॉ.आण्णासाहेब हजारे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,अविशांत कुमकर,अनंतदेवा जोशी, नगरसेवक, नागरिक, शिवभक्त उपस्थित होते.

छत्रपतींचे राजकारण आणि आजचे राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक आहे.आजपर्यंत माझे १३५ पोवाडे झालेले आहेत असे तनपुरे महाराज यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!