माय महाराष्ट्र न्यूज: सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 35 रुपयांनी किरकोळ महाग झाले आहे. या उडीसह आज सकाळी
सोने 52 हजार 913 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 162 रुपयांनी वाढला आहे. चांदी 68 हजार 952 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 702 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजार 220 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी
भाव 45 हजा 183 रुपये होता. 18 कॅरेटचा सोन्याच भाव 40 हजार 665 रुपयांवर पोहोचला आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 36 हजार 147 रुपयांवर पोहोचला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 70540 रुपयांवर पोहोचला आहे.
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच
नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.