माय महाराष्ट्र न्यूज:घरबसल्या आरामात नोकरी करायला कोणाला आवडणार नाही त्यात मनोरंजन असेल तर आणखी मजा. मात्र एका कंपनीत अशी नोकरी आहे, ज्यामध्ये आराम आणि मनोरंजन
दोन्हीचा उपभोग घेता येणार आहे. यामध्ये काम म्हणजे फक्त पॉर्न व्हिडीओ पाहायचे आणि पैसे कमवायचे अशी ही अनोखी नोकरी आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय.
द सनच्या वृत्तानुसार, या नोकरीबाबत कळताच अवघ्या दोन दिवसात 31 हजार लोकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. Bedbible असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी अॅडल्ट प्रोडक्टचे
रिव्ह्यू उपलब्ध करुन देते. त्यासाठी कंपनी एका तासाचे 1500 रुपये देते. विशेष म्हणजे या नोकरीसाठी जगभरातील कुठलीही व्यक्ती अर्ज करु शकते. कारण ही नोकरी कुठेही बसून करता येणार असून त्यासाठी ऑफीसला येण्याची गरज नाही.
नोकरीच्या जाहीरातीनुसार, Bedbible कंपनी ज्या कर्मचाऱ्याला नोकरीसाठी निवड करेल त्याच्या संपर्कात राहील. याच्या माध्यमातून कंपनी व्हिडीओचे टायमिंग, महिला पुरूष रेशो, केसांचा रंग, भाषा आदी माहिती गोळा करुन तपशीलवार
अहवाल तयार करेल. ज्याच्या माध्यमातून व्हिडीओ पाहणाऱ्या व्यक्तीच्या सवयीची माहिती करुन घेता येईल. यामध्ये निवडल्या गेलेल्या कर्मचाऱ्याला 50 तास पॉर्न व्हिडीओ पाहावे लागणार. त्यासाठी 75 हजार रुपये दिले जाणार आहेत.
21 वर्षावरील लोकं या नोकरीसाठी पात्र आहेत. Bedbible कंपनीच्या हेड कॉन्टेन्ट क्रिएटर एडविना कायतोच्या म्हणण्यानुसार पोर्नोग्राफी हे अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री आहे, या नोकरीसाठी निवडलेल्या
कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे संशोधन करु इच्छितो त्याने अनेक नवीन गोष्टी समोर येणार आहेत