Monday, May 23, 2022

1 रिचार्जमध्ये 3 सिम चालतील…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आता जवळ-जवळ सगळ्याच टॅलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्या आहेत. ज्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमध्ये फारसा फरक राहिला नाहीय.

बरेच लोक असे आहेत की, जे कंपनीची प्रिपेड सर्विस वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय काही कंपन्या आपल्या पोस्टपेड ग्रहकांना चांगल्या सुविधा देत आहेत. ज्यामुळे एका रिचार्जमध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब सर्विस वापरत आहे.

या पोस्टपेडमध्ये प्लानमध्ये तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधाही दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत, जे तुम्हाला सरासरी किमतीत चांगले फायदे देतात. येथे आम्ही

तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगत आहोत.Jio चा 799 रुपयांचा महिन्याच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम

कार्डांसह एक प्राथमिक सिम दिले जाते. यामध्ये तुम्हाला एकूण 150 GB डेटा मिळेल, पण तुम्ही 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

पोस्टपेड प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यत्व मिळते. जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टारसह जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Jio प्रमाणे, Airtel च्या या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक रेग्युलरची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 100 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल.

यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिक यांसारखी मेंबरशिप अॅमेझॉन प्राइमवर मोफत उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!