Wednesday, May 25, 2022

भर सभेत आमदार रोहित पवार भडकले ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार आपल्या संयमी आणि अभ्यासू स्वभावासाठी ओळखले जातात. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय

पातळीवरील मुद्द्यांवरही ते सतत व्यक्त होत असतात. सयंमी शब्दांत पण आकडेवारी आणि मुद्देसुदपणे केंद्र सरकारवरही त्यांनी अनकेदा टीका केली आहे.मात्र, अलीकडेच जामखेडमध्ये झालेल्या

राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात त्यांचे वेगळेच स्वरूप मतदारसंघातील लोकांना पहायला मिळाले. या मतदारसंघात केंद्र-राज्य सरकारच्या कामाचे श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. याशिवाय एकमेकांविरूद्धची

भाषणे आणि निवेदने यावरूनही वातावरण तापले आहे. याच मुद्यांचा पवार यांनी आपल्या भाषणात आक्रमकपणे समाचार घेतला.भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस

सचिन पोटरे यांच्यावरही नाव न घेता त्यांनी टीका केली. मार्चमध्ये केलेल्या एका आंदोलनाच्यावेळी पोटरे यांनी केंद्र सरकारच्या कामाचे श्रेय घेण्यावरून पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला रोहित पवार

यांनी उत्तर देताना आपल्या कार्यकर्त्यांनाही वेळप्रसंगी आक्रमक होत परस्पर अशा प्रकारांना उत्तरे देण्यास सांगितले आहे.दरम्यान, पोटरे आणि पवार यांच्यातील या आरोपप्रात्यारोपांची सध्या

कर्जत-जामखेडमध्ये चर्चा आहे. यावेळी रोहित पवार यांनी मी राजकारणासाठी काम करत नसून समाजाच्या कल्याणासाठी करतो. हिम्मत असेल तर मागून नाही पुढे येऊन बोला, असं आवाहनही यावेळी रोहित पवार यांनी केलं.

इतकंच नाहीतर त्यांनी सोशल मीडियावरूनही विरोधकांना उत्तर दिलं.मी इतकी कामं करतो की ती सोशल मीडियावर शेअर करू शकतो. तुम्ही कामच करत नसल्यामुळे तुमच्याकडे सोशल मीडियावर

शेअर करण्यासाठी काही नाही’ असंही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही सुनावलं. ‘एका दगडावर पाय ठेवा. दोन दगडांवर पाय ठेवून काम करू नका. आपल्यावर

कोणी टीका केली तर तुम्हीही त्यांना उत्तर द्या’, अशा सूचना रोहित पवार यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!