Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी: शिवसेना नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केडगाव येथे शिवसेनेच्या दोन कार्यकऱ्यांची दिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले

यांना दुरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. येवले यांनी धमकी संदर्भात कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यावरून आकाश पवार (रा. गोपाळगल्ली, केडगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

अहमदनगर महापालिकेतील नगरसेवक अमोल येवले यांनी तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी ( ता. 9 ) मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या दुरध्वनीवर आकाश पवार याने संपर्क केला. दुरध्वनीवर बोलताना ”मी गुन्हेगार आहे.

मला तुझी सुपारी मिळाली आहे. मी तुझा मर्डर करणार आहे,” असा दम दिला. यानंतर येवले यांनी आकाश पवारचा चुलत भाऊ सचिन पवार याला दुरध्वनीवर संपर्क केला. त्यावर सचिन याने येवले यांना सांगितले की

आकाशला तुमच्या मर्डरसाठी तीन कोटी रुपयांची सुपारी मिळाली आहे”. येवले आणि सचिन पवारचा दुरध्वनी चालू असताना स्थानिक रहिवासी मिठू नेटके यांचा येवले यांना दुरध्वनी आला. यानंतर नेटके आणि येवले यांच्यात दुरध्वनीवर चर्चा झाली.

‘आकाश तुम्हाला शोधत होता. दुरध्वनीवर करून त्याला बोलावून घे. मला त्याचा कार्यक्रम करायचा आहे”, असे म्हणत होता, अशी माहिती नेटके यांनी येवले यांना दिली. यानंतर येवले यांना अभिजीत कोतकर

यांचा दुरध्वनी आला. कुठे काही भांडण झाले आहे का? असे त्याने विचारले. येवले यांनी त्यावर नाही म्हणून सांगितले. दुरध्वनी बंद केल्यानंतर कोतकर याचा पुन्हा दुरध्वनी आला. हॉटेल सागरवर चेहरा कपड्याने

झाकलेले तिघे जण आले होते. अमोल येवले आहे का, असे त्यांनी विचारले. याठिकाणी खून होणार आहे, असे सांगून हॉटेलवर गोंधळ घालून ते निघून गेले, असे सांगितले. या सर्व प्रकाराची तक्रार येवले यांनी कोतवाली पोलिसांकडे केली आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!