Friday, May 20, 2022

औरंगाबाद जिल्हा पुन्हा चर्चेत:भर रस्त्यात शेकडो कंडोमचा सडा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वैजापूर तालुक्यात एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. खंडाळा-परसोडा रस्त्यावर शेकडो कंडोमचा ढिग आढळून आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे.

रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून ग्रामस्थांनाही धक्काच बसला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात कंडोम कुठून आले आणि रस्त्यावर का फेकण्यात आले याची आता परिसरात चर्चा सुरू आहे.

वैजापूरच्या विनायक साखर कारखान्याच्या चौफुलीपासून हाकेच्या अंतरावर खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो कंडोमचा ढीग पडलेला आढळून आला. कंडोमचा सडा बऱ्याच लांब पर्यंत

पडलेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हे कंडोम पाकीटमध्ये नव्हते तर मोकळे होते. तसेच त्यावर कोणतेही लोगो किंवा कंपनीचे नाव सुद्धा पाहायला मिळाले नाही. येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांनी

रस्त्यावरील कंडोम पाहून नजर फिरवून तेथून निघणे पसंद केले.याबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी हे कंडोम सापडले आहेत, तिथून तीन किलोमीटरच्या अंतरावर जिल्हा परिषदेचं आरोग्य केंद्र आहे.

बऱ्याचदा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशासन आरोग्य केंद्रात मोफत कंडोम उपलब्ध करून देतात. त्यामुळे हा कंडोमचा साठा तो तर नाही ना? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

पण यावर अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेनंतर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!