Monday, May 23, 2022

मुलामुळे बापाचा सन्मान : बाळासाहेब नाहाटा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे नेवासा:मुंबईतील राज्य बाजार समिती महासंघावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या बाजार समिती महासंघावरचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असतानाही अजित पवारांच्या आशीर्वादाने

बाळासाहेब नाहाटा हे सभापती झाले. नाहाटा यांची बाजार समिती महासंघाच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर लोणी व्यंकनाथ येथे नागरी सत्कार करण्यात आला.बाळासाहेब नाहाटा म्हणाले, अजित पवार यांचा तर मी कायम आभारी राहीन.

मात्र, त्याचसोबत हे पद मिळवून देण्यासाठी माझा मुलगा मितेश याने लावलेली फिल्डींग मोलाची ठरली. वयाने लहान असला तरी त्याने दाखविलेली परिपक्वता मोठी होती आणि त्यामुळे मला हे पद मिळाले, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब काकडे होते. विचारपीठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यासह गणपतराव काकडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, प्रवीण कुरुमकर, पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, बाळासाहेब थोरात, मितेश नाहाटा, मनिषा नाहाटा, सतीश बोरा, विजय शेंडे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी दिली. अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. तरीही बिनविरोध संचालक आणि आता सभापतीपदाची जबाबदारी दिली. त्यांचे हे उपकार विसरणार नाही.

आमदारकीसाठी ते ज्याचे नाव सुचवतील तोच श्रीगोंद्यातील पुढचा आमदार असेल, असे सुतोवाच बाळासाहेब नाहाटा यांनी केले.ते पुढे म्हणाले, गावाने माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळे अगोदर तालुक्यात कामाची संधी मिळाली. श्रीगोंदे बाजार समितीत नि:स्वार्थी काम केले.

त्याचा फायदा आता होत आहे. राजकारणात अनेक पक्ष, नेते बदलले. हे सर्व विकासासाठी केले. अजितदादांनी विश्वासाने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला राष्ट्रवादीत नसतानाही बाजार समिती महासंघाचे सभापती केले. त्यांचे हे उपकार विसरणार नाही.

यापुढे केवळ अजित पवार व राष्ट्रवादी यांच्यासाठीच काम करणार आहे. श्रीगोंद्याचा पुढचा आमदार हा राष्ट्रवादीचा करण्यासाठी जीवाचे रान करेल. ज्या नेत्याचे नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी येईल तोच आमदार होईल, असेही नाहाटा यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!