माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात ३ मे नंतर विस्फोटक स्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांच्या गोपनीय अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे चं अल्टिमेटम
दिलंय. त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल बनवण्यात आलाय. त्यामुळे, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गृह खात्यानं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत गृहमंंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगितलं.
महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस सज्ज असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल
असं गृहमंत्री म्हणाले. तसेच केंद्र सरकार दोषींना सुरक्षा पुरवतंय असा आरोप त्यांनी करत हा राज्याच्या अधिकारांवर गदा आहे असा टोला वळसे-पाटलांनी लगावला आहे.मशिदींवरील भोंगे
काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे चं अल्टिमेटम दिल्यानंतर मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आज राज्याचे डीजीपी आणि सर्व आयुक्त तसंच आयजी रेंज अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना भोंगा आणि स्पिकरबाबतचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले होते.
सर्व प्रयत्न झाल्यानंतर आता राज्यात अराजकता माजविण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. त्यासाठीच आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सूचित करतोय, असं आम्ही त्यावेळी विधान केलेलं होतं. कारण
या राज्यात अराजकता माजावी, दंगल घडावी अशी भावना काही लोकांची आहे. मी त्यांचे नाव घेत नाही. त्या सर्व लोकांपासून खबरदारी घेण्याची आज गरज आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.