Friday, May 20, 2022

अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात, महिलेसोबतचा व्हिडिओ होता चर्चेत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गंगापूर तालुक्यातील अश्लील व्हिडिओतील कीर्तनकार बाबाला बेड्या ठोकण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना अखेर यश आलं आहे. एप्रिल महिन्याच्या

सुरुवातीला गंगापूरमधील या कीर्तनकार बाबाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनांकडून कीर्तनकार

महाराजावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीनुसार, हा व्हिडिओ मोगल यानेच चित्रीत केला असून

तो या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर लीक झाला होता. मात्र कीर्तनकार महाराजांच्या अशा व्हिडिओमुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती.कीर्तनकार बाबाचा अशा प्रकारे एका शिष्य महिलेसोबतचा

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे करण्यात आली होती. 08 एप्रिल रोजी त्यांनी सदर कीर्तनकार

बाबा आणि व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कीर्तनकार बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला. अखेर मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

या अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिल्लेगाव पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओतील महाराज आणि महिलेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.

तशी रितसर तक्रार त्यांनी 10 एप्रिल रोजी दाखल केली होती. त्यानंतर व्हिडिओतील दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून गंगापूर येथील कोर्टात त्याला हजर केले

असता न्यायालयाने महाराजाला जामीन मंजूर केल्याचीही प्राथमिक माहिती हाती आली आहे. औरंगाबादमध्ये प्रसिद्ध असलेल्या या महाराजाचा असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...
error: Content is protected !!