Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याच्या भावात वाढ तर याठिकाणी स्थिर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या आवकेत व भावात वाढ झाली.

काल बुधवारी 14 हजार 227 गोण्या आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती दुप्पट आहे. भाव एक-दोन लॉटला 1400 ते 1500 पर्यंत निघाले. मोठा कलरपत्ती कांद्याला 1200 ते 1300 रुपये,

मुक्कल भारी कांद्याला 800 ते 950 रुपये, गोल्टा कांद्याला 500 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 400 रुपये, जोड कांद्याला 250 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत काल बुधवारी कांद्याला 1250 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 7300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत काल 2281 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 450 रुपये,

गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....
error: Content is protected !!