Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्यातील घटना:तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा सख्या भावांना अखेर 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तरुणास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा सख्ख्या भावाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 19 हजार

रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दया उर्फ बोंदू मच्छिंद्र नेटके व हरिश उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकाश तात्या खंडागळे या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकाशचे वडील तात्या हरी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 326, 504 व 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला होता.

तात्या खंडागळे यांच्या घरासमोर दया नेटके व हरिश नेटके हे दोघे सख्खे भाऊ राहतात. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री दया नेटके व हरिश नेटके यांचे आपसात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ चालू होती.

सदरच्या शिव्या तात्या खंडागळे यांचा मुलगा प्रकाश व नाती यांना ऐकू येत असल्याने प्रकाश यास ते सहन न झाल्याने त्याने घराचे बाहेर येऊन नेटके बधूंना म्हणाला,‘शिवीगाळ करू नका, येथे माझ्या मुली राहतात’.

त्यावर हरिश नेटके याने प्रकाशला शिवीगाळ व दमदाटी केली व अंगावर धावत जाऊन त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.दया नेटके यास आवाज देवून,‘दया याला ठार मार, जीवंत सोडायचे नाही’, अशी चिथावणी दिली.

दयाने स्वतः चे घरात पळत जाऊन धारदार चाकू घेऊन प्रकाश यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला.

घटनेबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!