Tuesday, May 17, 2022

अल्पवयीन पत्नीसोबत सेक्स करणे गुन्हाच

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे हा गुन्हाच आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन पत्नीशी शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी

आरोपीविरोधात बाल विवाह बंदी कायदा आणि पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासाठी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. परंतु कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे.

२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने याबाबात निर्णय दिला होता. बालविवाहाबात कोर्टाने कुठलीही सबब ऐकूण घेण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने एका बाळाला जन्म दिला.

जेव्हा तिला तिचे वय विचारण्यात आले तेव्हा तिने आपले वय १७ सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांत या प्रकरणी बालविवाह आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल आणि पीडित तरुणीच्या

नवर्‍याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. लग्नाच्या वेळी आपली बायको अल्पवयीन आहे हे आपल्याला माहित नव्हते असे कारण आरोपीने पुढे केले होते.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्याचा आधार घेण्यात आला आहे. बालविवाहात पीडिते

वय १८ वर्षाच्या आत असेल तर यात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पूर्वी वयोमर्यादा १५ वर्षे होती. नंतर २०१७ च्या निर्णयात वयोमर्यादा १८ वर्षे सांगण्यात आली.

आपल्या पत्नीने शारिरीक संबंधांना विरोध केला नाही असा दावा आरोपीने केला होता. परंतु पीडितेचे वय १७ असून ती अल्पवयीन असल्याने कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच पीडित

मुलगी विवाहित असो वा अविवाहित तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. पीडितेने आरोपीला जामीन देण्यास आपली हरकत नसल्याचे म्हटले होते. परंतु बालविवाहाबाबत

सक्त कारवाई झाली पाहिजे असे मत कोर्टाने व्यक्त करून आरोपीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!