Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यात येऊन सुप्रिया सुळेंने काँग्रेसला दिला मोठा धक्का

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि पक्ष वाढीचा ही कार्यक्रम नगर मध्ये पार

पडला आणि याच दरम्यान त्यांनी काँग्रेसला एक दणका दिला आहे.जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नगरपालिकेत सत्ताधारी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादीत राजकीय लढत होणार असून त्या पार्श्वभूमीवर दोन्हीही पक्षातील

नेत्यांनी नगरसेवक तथा वजनदार ताकदीचे नेते आपल्या गोटात कसे सामील होतील, याकडे लक्ष केंद्रित केले असून काँग्रेसच्या दोन नगरसेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक, साई संस्थानच्या विश्वस्त तथा माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व काँग्रेसचा ससाणे गट यांच्यात श्रीरामपूर पालिकेत प्रमुख लढती रंगणार आहे. काँग्रेसचे आमदार कानडे गट व ससाणे गटात मतभेद वाढले आहेत.

त्यात ससाणे गटाने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी जवळीक साधल्यानंतर आमदार कानडे गटाने आदिक गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. श्रीरामपूर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय

व्यूव्हरचनेला वेग आला आहे. सुप्रिया सुळे अहमदनगर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अनुराधा आदिक यांनी मुत्सदेगिरी करत काँग्रेसच्या प्रभाग चारचे

नगरसेवक प्रकाश ढाकणे आणि प्रभाग ५ चे दिवंगत नगरसेवक सुभाष गांगड यांचे चिरंजीव सोमनाथ गांगड या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!