Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील घटना:80 वर्षीय वृध्द महिला वकिलासह म्हणाला तू माझ्याशी बोलत रहा, माझ्याशी संबंध ठेव, नाही ठेवले तर 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:80 वर्षीय वृध्द पक्षकाराने एका महिला वकिलाचा विनयभंग करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अहमदनगर शहरात ही घटना घडली

असून उपनगरात राहणार्‍या महिला वकिलाने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा दशरथ तुकाराम गायकवाड (वय 80 रा. भोयरे पठार खुर्द ता. नगर) याच्याविरूध्द

354, 354 (ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगर शहरातील एका वकिलाकडे फिर्यादी ज्युनीयर असिस्टंट म्हणून काम करत असताना त्या वकिलांचा जुना पक्षकार

असलेला गायकवाड त्यांच्या कार्यालयात नेहमी येत असे. तेथे तो फिर्यादीजवळ येऊन बसत असे व त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत असे. याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या वकिलांना याबाबत माहिती दिली होती.

त्यावेळी वकिलांनी गायकवाडला कार्यालयात येण्यास बंदी घातली होती.मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी गायकवाड हा फिर्यादीला म्हणाला,‘तू माझ्याशी बोलत रहा, माझ्याशी संबंध ठेव, नाही ठेवले तर तुझी बदनामी करेन’

फिर्यादी तेथून निघून गेल्यानंतर त्याने त्यांचा पाठलाग केला व मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणत फिर्यादीच्या अंगाला स्पर्श केला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्यांना

शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!