माय महाराष्ट्र न्यूज:देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 11 वा हप्ता सरकार मे महिन्यात देऊ शकते. अनेक राज्यांनी याला मंजुरीही दिली आहे.
10 व्या हप्त्यानंतर सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. त्यासाठी अंतिम तारीख ३१ मे 2022 ही करण्यात आली आहे. मात्र जर या योजनेअंतर्गत एखादा शेतकरी अपात्र ठरत असेल, तर त्यांना
पैसे परत करावे लागणार आहेत. अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी अपात्र शेतकऱ्यांना नोटीसदेखील देण्यात येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असल्याची आणि त्याच्या निकषांची खातरजमा करून घ्यावी. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी यूपीच्या जालौन
जिल्ह्यात बनावटगिरी समोर आली आहे. यानंतर विभागाने १७४० शेतकऱ्यांना नोटिसा बजावून निधीची रक्कम परत करण्यास सांगितले आहे. वास्तविक, योजनेचा उद्देश लहान शेतकऱ्यांना
आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.याअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवले जातात.
ही रक्कम 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. ही योजना सुरू झाली, त्याचवेळी पगारदार शेतकरी आणि प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत, असे सांगण्यात आले होते.
पण उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या १७४० शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याची चर्चा आहे.आता विभागीय अधिकाऱ्यांनी सर्व अपात्र मिळकतकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना
निधीचे पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शेतकरी स्वत: येथे येत आहेत आणि चेकद्वारे पैसे परत करत आहेत.केंद्र सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांची
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते. दर चार महिन्यांनी
तीन वेळा दोन हजार करून ही रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत १० हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता पुढील हप्ता म्हणजेच ११ व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.