Wednesday, May 25, 2022

सरकारच्या पोलीस बढती बदली आदेशाला २४ तासांत स्थगिती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीचे आदेश बुधवार २० एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आले होते.

या आदेशांना २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाल्यामुळे पोलिसांच्या बढती बदलीचे

आदेश स्थगित करण्यात आले अशी चर्चा आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आदेश स्थगित केला आहे की नाही या मुद्यावर अधिकारी सूचक मौन बाळगत असल्याचे चित्र आहे.

याआधी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना पोलिसांच्या बढती बदलीच्या आदेशांवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री असताना पुन्हा एकदा पोलिसांच्या बढती बदलीच्या आदेशांवरून मतभेद असल्याची चर्चा आहे. आदेश स्थगित होण्यामागे काही राजकारण दडलं आहे की अर्थकारण अशीही चर्चा जोरात आहे.

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. या सर्वांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलं असून नेमकं असं काय घडलं की निर्णय मागे घ्यावा लागला असा प्रश्न विचारला जात आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!