माय महाराष्ट्र न्यूज:कधी-कधी आपण एखाद्या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेची कथा इतर स्त्रियांसाठी धडा आहे.
तिच्यावर वेळेत उपचार झाल्यानं तिचे प्राण वाचले. डेलीमेलच्या अहवालानुसार, 19 व्या वर्षी कॅथरीन हॉक्सला पाळीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याची समस्या होती. त्या वेळी ती
शिक्षणासाठी तिच्या पालकांपासून वेगळ्या शहरात राहत होती.एक दिवस कॅथरीनला खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि अचानक बेशुद्ध झाली. तेव्हा तिनं पाळीविषयीचा संकोच बाजूला ठेवत
पाळीच्या वेळच्या अतिरक्तस्रावाच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. कॅथरीनच्या या निर्णयानेच तिचा जीव वाचवला. डॉक्टरांनी ती रक्ताच्या कर्करोगानं ग्रस्त असल्याचं निदान केलं. शिवाय, जर
आणखी एक आठवडा उशीर झाला असता तर तिचा जीव जाऊ शकला असतं, असंही सांगितलं. कॅथरीनला पाळीच्या वेळेस होणारा अतिरक्तस्राव एक्यूट प्रोमायलोसाइटिक ल्यूकेमियाचं (APL) लक्षण होता.
याचं लवकरच रक्ताच्या कर्करोगात रूपांतर होतं. सुरुवातीला, कॅथरीनच्या नेहमीच्या डॉक्टरांनी तिची रक्त तपासणी केली आणि सांगितलं की, ती खूप अशक्त (अॅनिमिक) आहे. त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात भरती होऊन तातडीनं ट्रीटमेंट सुरू करण्याचा सल्ला दिला.
घाबरलेल्या कॅथरीननं तिच्या दोन रूममेट्ससोबत रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी तिला ल्युकेमिया असून लगेच उपचार सुरू करावे लागतील असं सांगितलं. जेव्हा APL होतो तेव्हा अस्थिमज्जा (बोन मॅरो – रक्तपेशींचा स्त्रोत) खूप अपरिपक्व
पांढऱ्या रक्त पेशी बनवण्यास सुरुवात करते. यामुळे, इतर निरोगी रक्तपेशी तयार करण्यासाठी शरीरात पुरेशी जागा नसते आणि त्यांची संख्या कमी होते.लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन
वाहून नेण्याचं काम करतात आणि त्यांच्या अभावामुळं श्वास लागणे आणि सुस्तीची भावना निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात. हे प्लेटलेट्सच्या कमतरतेचं लक्षण आहे. डॉक्टरांच्या मते, थकवा आणि त्वचेच्या
समस्यांसह पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव हेदेखील APL चं प्रमुख लक्षण आहे. नाक-हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि मासिक पाळीमध्ये असामान्यपणे अचानक बदल हीदेखील गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात.